Leopard Attack : शेतकऱ्यांना शेती करताना अनेक मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. शेतात काम करत असताना जंगली प्राण्यांपासून शेतकऱ्यांना नेहमीच सावध राहावे लागते. यामध्ये साप असतील बिबट्या, कोल्हे, लांडगे अशा वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांना नेहमीच सावध राहावे लागते. मात्र मागच्या काही दिवसापासून शेतकऱ्यांवर बिबट्याचे हल्ला करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. दरम्यान आता सिन्नर तालुक्यातील सोमठाणे भागात 17 वर्षीय तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.
Rain Update : चंद्रपूरमध्ये पुरस्थिती, मोठं मोठे बंगले बुडाले पाण्यात; समोर आले धक्कादायक फोटो
माहितीनुसार, बिबट्याच्या हल्ल्यामध्ये हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी झालेल्या तरुणाचे नाव कृष्णा असे आहे. या तरुणावर बिबट्याने हल्ला करताच हा तरुण आरडाओरडा करू लागला. त्यानंतर शेजारच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शेतकऱ्यांना पाहतात बिबट्याने धूम ठोकली मात्र या घटनेत कृष्णा गंभीर जखमी झाला आहे. (Leopard Attack)
त्यानंतर लगेचच घटनास्थळी तरुणाचे कुटुंबीय दाखल झाले. यानंतर तरुणाला लगेचच उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. सध्या या तरुणावर नाशिक सिविल मध्ये उपचार सुरू आहेत. तरुणावर झालेल्या या हल्ल्यामुळे त्या ठिकाणच्या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये पुन्हा भीतीचे वातावर निर्माण झाले आहे. त्याचबरोबर पिंजरा लावण्याची मागणी देखील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
Agriculture News । धक्कादायक! साखर कारखानदारांनी थकवले FRP चे 800 कोटी रुपये, होणार कडक कारवाई