सोशल मीडियावर अनेक थक्क करणारे व्हिडिओ आपल्याला पहायला मिळतात. खाण्याच्या वेगवेगळ्या प्रकारांपासून ते प्राण्यांच्या विविध करामतींचा यामध्ये समावेश असतो. सोशल मीडियावर ( Video On Social Media) नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये दिसतंय की, जंगलातील एक बिबट्या रात्रीच्यावेळेत घराच्या गेटवरुन उडी मारुन प्रवेश करतो आणि कुत्र्यावर हल्ला करतो. व्हिडिओमध्ये तुम्ही हे पाहू शकताय.
धक्कादायक! अवकाळी पावसामुळे शेतात गव्हाचे पीक पडले आडवे; चिंताग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या
या व्हायरल झलेल्या व्हिडिओमध्ये बिबट्या घराच्या गेटवरुन उडी मारुन आतमध्ये आला आणि त्यावेळी तिथे घरात झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला आहे. यानंतर कुत्रा आणि बिबट्या यांच्यामधील चांगलाच संघर्ष पाहायला मिळत आहे. आणि नंतर शेवटी घरातील मालक बाहेर आला आणि बिबट्याने त्या ठिकाणाहून धूम ठोकली असल्याचं चित्र आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे.
रामदास कदम यांना मोठा धक्का! जवळच्या माणसावर ईडीची मोठी कारवाई
हा व्हिडीओ ppredator_wildlifevids या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकजण कमेंट करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘अशा ठिकाणी लोक कुत्र्यांना बाहेर का सोडतात’. अशा अनेक वेगेवेगळ्या कमेंट नेटकरी करत आहेत.