गाणी ऐकूण गायींच्या दुधात होते वाढ, तरुणाने केले सिद्ध; वाचा सविस्तर

Listening to songs increases the milk of cows, proved by a young man; Read in detail

अनेक शेतकरी जोडव्यवसाय म्हणून दूध व्यवसाय करतात. यासाठी शेतकरी गायी-म्हशी देखील पाळतात. या गायी-म्हशींपासून भरपूर दूध मिळावे यासाठी शेतकरी वेगवेगळे उपाय करतात. सध्या सोशल मीडियावर यासंदर्भात एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये दूध वाढवण्यासाठी एका तरुणाने गायींना चक्क गाणी ऐकवली आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

जिममध्ये व्यायाम करताना मृत्यूचं प्रमाण वाढतंय; अभिनेता सुनील शेट्टी यांनी सुद्धा केलं मोठं वक्तव्य

गायींच्या दुधात वाढ होण्यासाठी हिरवा चारा देणे, वेगवेगळी औषधे देणे यांसारखे उपाय बऱ्याचदा केले जातात. परंतु, तुर्की (Turki) येथील इज्जत कोकॅक या तरुणाने दुधाचे उत्पादन वाढावे यासाठी हा अनोखा फंडा वापरला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये कोकॅकने गायींच्या कानात हेडफोन्स घातले असून त्या दूध देत आहेत. दरम्यान गाणी ऐकल्याने जनावरांवर भावनिकदृष्ट्या प्रभाव पडतो व त्यांचे मानसिक संतुलन चांगले होऊन दूध उत्पादन वाढते. असे इज्जत कोकॅकचे म्हणणे आहे.

चंपक चाचांचा अपघात; ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ चे चित्रीकरण थांबले

इज्जत कोकॅक ( Ijjat kokak) या तरुणाने 100 गायी पाळल्या आहेत. या जनावरांपासून त्याला दिवसाला 22 लिटर दूध मिळत होते. परंतु, जेव्हापासून जनावरे गाणी ऐकू लागली आहेत, तेंव्हापासून दुधाच्या उत्पादनात वाढ झाली असल्याचे इज्जतचे म्हणणे आहे. गायींचे मन प्रसन्न राहिल्याने त्यांच्या उत्पादनात वाढ होते. असे या व्हिडीओ मधून दिसून येत आहे.

कुठलाच क्लास न लावताच झाली आयएएस अधिकारी; वाचा कृषीकन्येची यशोगाथा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *