
मुंबई : आपण नेहमी पाहत असतो की सोशल मीडियावर(Social media) रोज काहीना काही व्हायरल होत असत.नवनवीन ट्रेंड येतात आणि त्या ट्रेंडवरील व्हिडिओ अनेकजण शेअर करत असतात.त्यात सध्या अनेक वर्षे जुने ‘गोमी-गोमी, गोमी’(gomi gomi song) हे गाणे इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.यूजर्स या गाण्यावर आपले वेगवेगळे डान्स व्हिडीओ(Dance Video) बनवत तो सोशल मीडियावर शेअर करू लागले आहेत. लहानच नाही तर वृध्दांना देखील या गाण्याचं वेड लागलं आहे.
अशातच सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भैयानी आपल्या इन्स्टाग्रामवर मनोरंजन जगताशी संबंधित व्हिडीओ आणि पोस्ट सतत शेअर करत असतात. अशातच त्यांनी एका मुलीचा दिल्ली मेट्रोमध्ये ‘गोमी-गोमी, गोमी’ (GOMI-GOMI Dance)या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.मुलीचा हा व्हिडीओ इंटरनेटवर (Internet)चांगलाच धुमाकूळ घालत आहे. आपल्या क्यूट डान्सने तिने लोकांची मन जिंकली आहेत.
Eknath Khadse: अधिवेशनात झालेल्या आमदाराच्या राढयावर एकनाथ खडसेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
व्हिडिओत नेमक काय दिसतय
विरल भैयानीने (veral bhaiyani)पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये चिमुकलीने चालत्या मेट्रोत ‘गोमी-गोमी, गोमी’ या गाण्यावर डान्स केला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये मेट्रोच्या सीटवर मोठ्या संख्येने प्रवासी बसलेले आहेत. तिथे काही तरूण उभे राहिलेले आहेत.चालत्या मेट्रोमध्ये अचानक ही चिमुकली गोमी गोमी गाण्यावर नाचू लागते. तिला नाचताना पाहून मागे उभे असलेल्या तरूणांपैकी दोन मुली बाजुला लपताना दिसतात.
पण यातला एक मुलगा जागीच उभा राहतो आणि तो सुध्दा या गाण्यावर थिरकू लागतो. या व्हिडीओमध्ये चिमुकली डान्स करत असताना तिने तिच्या चेहऱ्यावर जे गोड एक्सप्रेशन्स दिले आहेत.तिचे गोड एक्स्प्रेशन पाहून लाखो लोक तिच्या प्रेमात पडू लागले आहेत. विशेष म्हणजे ही मुलगी दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करत असताना तिचे पालक तिला ‘गोमी-गोमी’ गाण्यावर डान्स करायला सांगतात.