
मुंबई : सध्याच्या सध्या लंपी स्कीन या आजाराने थैमान घातले आहे. हा आजार राज्यभर मोठ्या वेगाने पसरतोय. आता यासंदर्भात आता स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महत्वाच्या सूचना पशुपालक शेतकऱ्यांना दिल्या आहेत. राजू शेट्टी म्हणाले की, “लम्पी स्कीन’च्या प्रादुर्भाव पाहता राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांनी सर्वंच जनावरांचा येत्या दहा दिवसांत विमा उतरवावा. यामुळे जर या आजारात जनावर दगावले तर पशुपालकांना आर्थिक सहाय्य म्हणून विमा मिळेल.
राज्यामध्ये सध्या लसीकरणाचा देखील तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या पशुपालक शेतकरी चिंतेत आहे. जनावरे दगावण्याची देखील शक्यता आहे. यामुळे खबरदारी म्ह्णून, केंद्र व राज्य सरकारने राज्यातील सर्व जनावरांचा लवकरात लवकर विमा उतरवावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केलीये.
दरम्यान, भारतीय शास्त्रज्ञांनी लम्पी रोगावर लस तयार केली आहे. तसेच या लसीकरणाबरोबरच जनावरांच्या तपासणी चाचण्यांना वेग देऊन जनावरांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. यावरून लम्पी हा आजार अटोक्यात आणला जाईल. 2025 पर्यंत देशातील प्रत्येक जनावराला तोंडाच्या आणि पायाच्या आजावर लस दिली जाणार असल्याचे नोएडामध्ये वर्ल्ड डेअरी सिमिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.भारतीय शास्त्रज्ञांनी लम्पी रोगावर लस तयार केली आहे. तसेच या लसीकरणाबरोबरच जनावरांच्या तपासणी चाचण्यांना वेग देऊन जनावरांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. यावरून लम्पी हा आजार अटोक्यात आणला जाईल. 2025 पर्यंत देशातील प्रत्येक जनावराला तोंडाच्या आणि पायाच्या आजावर लस दिली जाणार असल्याचे नोएडामध्ये वर्ल्ड डेअरी सिमिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.
Cheetah Is Back: तब्बल 70 वर्षांनंतर नामिबियातून भारतात आले आठ विदेशी चित्ते