Load Shedding । राज्यात पुन्हा लोडशेडिंग! दररोज ‘इतके’ तास गायब होणार वीज

Load shedding again in the state! Electricity will disappear for 'so many' hours every day

Load Shedding । राज्याकडे यंदा पावसाने पाठ फिरवली (Rain in Maharashtra) आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे तर दुसरीकडे विजेची मागणी वाढली आहे. राज्यावर दुहेरी संकट आले असून पुन्हा लोडशेडिंग (Load Shedding in Maharashtra) होऊ शकते. याचा फटका शेतीवर होऊ शकतो. उभी पिकं हातची जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Latest Marathi News)

Jalna lathi charge । लाठीचार्जने वातावरण तापलं! मराठा आंदोलक घेणार मोठा निर्णय

सूत्रांच्या माहितीनुसार, वाढलेली मागणी आणि निर्माण झालेला विजेचा तुटवडा (Power shortage) यामुळे नागरिकांना आता रोज अर्धा तास ते दोन तासांच्या लोडशेडिंगला सामोरे जावे लागणार आहे. राज्यात जर विजेची वाढलेली मागणी किंवा मुबलक प्रमाणात पाऊस झाला तर लोडशेडिंग आपोआप कमी होईल, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Power Shortage in Maharashtra)

Sharad Pawar । बिग ब्रेकिंग! आज शरद पवार जालन्यातील जखमी आंदोलकांची घेणार भेट

एकीकडे महावितरणकडून आवश्यक साहित्याचा पुरवठा केला जात नाही तर दुसरीकडे वीज पुरवठा नीट होत नसल्याने शतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. शिवाय महाजेनकोने कमी पावसामुळे औष्णिक वीज केंद्रातील अनेक युनिट देखभालीसाठी बंद ठेवल्यानेदेखील विजेची मागणी आणि पुरवठ्यात तब्बल 2 ते 3 हजार मेगावॅटचा तुटवडा निर्माण झाला आहे.

Agri News । शेतकऱ्यांनो.. करा ‘या’ पिकची लागवड, अवघ्या 5 ते 6 महिन्यातच व्हाल लखपती

राज्यात यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यावर दुष्काळाचं सावट घोंगावू लागले आहे. देशात आत्तापर्यंत 91 टक्के पाऊस झाला आहे. त्यात आता आपत्कालीन लोडशेडिंग केले जात आहे. पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांकडून कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे.

Agri News । शेतकरी बंधूंनो, शेडनेट उभारून मिळवा 3 लाख 55 हजारांचे अनुदान, असा घ्या लाभ

Spread the love