Lok sabha election 2024 । ब्रेकिंग! काँग्रेसने लोकसभेसाठी उमेदवारांची चौथी यादी केली जाहीर; महाराष्ट्रातील या नेत्यांना मिळाली संधी

Congress

Lok sabha election 2024 । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. या यादीमध्ये काँग्रेसच्या ४६ उमेदवारांची नावे आहेत. यातील ४ उमेदवार हे महाराष्ट्रातील असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसने शनिवारी लोकसभा उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने राजस्थानमधील तीन जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.

Topers Ad

Sujay Vikhe Patil । खासदार सुजय विखे पाटील यांचे सर्वात मोठे वक्तव्य!

राजस्थानमधील जयपूर ग्रामीणमधून अनिल चोप्रा, करौली-धोलपूरमधून भजनलाल जाटव आणि नागौरची जागा आरएलपीसोबत युतीसाठी सोडण्यात आली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील देखील ४ नेत्यांचा या यादीमध्ये समावेश आहे. (Lok sabha election 2024)

Politics News । मोठी बातमी! ‘या’ 5 जागांवर महायुती अडचणीत, तोडगा निघेना

महाराष्ट्रातून या चार नावांचा समावेश

१) भंडारा गोंदिया : डॉ. प्रशांत यादवराव पडोळे

२) गडचिरोली चिमूर : नामदेव किरसान

३) रामटेक (राखीव एससी) : रश्मी श्यामकुमार बर्वे

४) नागपूर : विकास ठाकरे

Devendr Fadanvis । ब्रेकिंग! राजकीय घडामोडींना वेग, फडणवीस दिल्लीत दाखल; लवकर होणार मोठा निर्णय

नाना पटोले निवडणूक लढवणार का?

भंडारा गोंदिया लोकसभेची उमेदवारी संदर्भात काँग्रेसकडून नाना पटोले यांना उमेदवारी जाहिर होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र नाना पटोले लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी आता डॉक्टर प्रशांत पडोळे यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली आहे.

Spread the love