Lok Sabha Election 2024 । नाना पाटेकर (Nana Patekar) त्यांच्या चित्रपटामुळे कायम चर्चेत असतात. नाना पाटेकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अशा अनेक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत ज्यात व्यवस्थेविरुद्ध आक्रमकता दिसून येते. नानांच्या फिल्मोग्राफीमध्ये सर्व प्रकारच्या चित्रपटांचा समावेश होतो. अॅक्शनसोबतच त्यांनी सोशल ड्रामा आणि कॉमेडीमध्येही आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. नानांच्या अभिनयाचा सशक्त पैलू म्हणजे त्यांची डायलॉग डिलिव्हरी. यामुळे त्यांचे चित्रपट चर्चेचा विषय ठरतात. मात्र सध्या नाना पाटेकर यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठं वक्तव्य केले आहे.
एका मुलाखतीमध्ये नाना पाटेकर यांना विचारण्यात आले होते की आगामी लोकसभा निवडणुकीबाबत त्यांचे मत काय आहे? त्यावर ते म्हणाले की, देशासमोर भाजपशिवाय पर्याय नाही. त्यांच्या मते नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या खुर्चीवर विराजमान होतील. त्यांचे शब्द होते: आगामी निवडणुकीत भाजपला 350-375 जागा मिळतील आणि भाजप पुन्हा सत्तेत येईल. असं त्यांनी वक्तव्य केले आहे.
त्याचबरोबर पुढे ते म्हणाले, “भाजप देशात चांगले काम करत आहे. त्यामुळे 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपला नक्कीच यश मिळेल आणि नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील. देशासमोर भाजपशिवाय दुसरा पर्याय नाही”. सध्या त्यांच्या वक्तव्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे.