Lok Sabha Election 2024 । 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘इंडिया आघाडी’ला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीला मोठा झटका बसला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणूक एकट्याने लढण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसवर निशाणा साधत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, काँग्रेसने टीएमसीचा प्रस्ताव नाकारला, त्यामुळे त्यांच्या पक्षाने एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Bachchu Kadu । मराठा समाजाला आरक्षण कधी मिळेल? बच्चू कडू यांनी सांगितली आरक्षणाची तारीख
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘पश्चिम बंगालमध्ये आम्ही एकट्याने लोकसभा निवडणूक लढवू. आम्ही दिलेले सर्व प्रस्ताव फाडून टाकले. माझा प्रस्ताव मान्य झाला नाही, त्यामुळे आता आम्ही एकटेच निवडणूक लढवू.” त्या पुढे म्हणाल्या की, राहुल गांधींची सभा होती, आम्ही इंडिया आघाडीत असूनही आम्हाला त्याची माहिती देण्यात आली नाही.
दरम्यान, ममतांच्या घोषणेवर भाजप नेते गौरव भाटिया यांनी टोमणा मारत म्हटले की, ‘म्हैस पाण्यात गेली आहे. अहंकार की झांडिया?” तर भाजप नेते गिरिराज सिंह म्हणाले की, हे लोक पंतप्रधान मोदींचा पराभव करण्यासाठी एकत्र आले होते. मात्र या अहंकारी युतीमध्ये सर्वांनाच पंतप्रधान व्हायचे आहे. याशिवाय काँग्रेस नेते प्रमोद कृष्णम म्हणाले की, त्यांचे लक्ष्य भाजप नसून काँग्रेस आहे. महायुतीचे नेते मनाने एक नाहीत.
Rohit Pawar । मोठी बातमी! रोहित पवारांची आज ED चौकशी होणार; शरद पवार, सुप्रिया सुळे असणार सोबत