Lok Sabha Election । ब्रेकिंग न्यूज! ‘या’ मतदारसंघातून अभिनेत्री कंगना राणौत लढवणार लोकसभा निवडणूक; भाजपने दिले तिकीट

Kangana Ranaut

Lok Sabha Election । भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. या यादीत एकूण 111 उमेदवारांची नावे आहेत. भाजपने हिमाचलमधील मंडीमधून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला (Kangana Ranaut) तिकीट दिले आहे, तर अरुण गोविल यांना उत्तर प्रदेशातील मेरठमधून उमेदवार म्हणून घोषित केले आहे. यावेळी पक्षाने पिलीभीतमधून विद्यमान खासदार वरुण गांधी यांचे तिकीट रद्द केले आहे.

Topers Ad

Congress । काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

गाझियाबाद मतदारसंघातून भाजपने वरुण गांधी यांच्या जागी जितिन प्रसाद आणि विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री जनरल व्हीके सिंह यांच्या जागी अतुल गर्ग यांना तिकीट दिले आहे. खुद्द जनरल व्ही के सिंह यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता.

Bjp । ब्रेकिंग! भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी केली जाहीर; पहा कोणत्या नेत्यांना मिळाली संधी?

भाजपच्या पाचव्या यादीत यूपीच्या 13 लोकसभेच्या जागांसह आंध्र प्रदेशच्या 6 जागा, बिहारच्या 17 जागा, गोव्याच्या 1 जागा, गुजरातच्या 6 जागा, हरियाणाच्या 4 जागा, हिमाचल प्रदेशच्या 2 जागा, झारखंडच्या 3 जागांचा समावेश आहे. कर्नाटक आणि केरळमधील प्रत्येकी 4 जागांवर, महाराष्ट्रातील 3 जागा, मिझोराममध्ये एक, ओडिशातील 18 जागा, राजस्थानमध्ये 7 जागा, सिक्कीममधील एक जागा, तेलंगणातील 2 आणि पश्चिम बंगालमधील 19 जागांवर यादी जाहीर करण्यात आली आहे.

Sharad Pawar । शरद पवार यांना सर्वात मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याने वेळेवर दिला धोका

Spread the love