Lok Sabha Election । अखेर ठरलं! ‘या’ दिवशी जाहीर होणार लोकसभा निवडणुकीच्या तारखा

Lok Sabha Election

Lok Sabha Election । राज्यात लवकरच लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2024) जाहीर होणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. राजकीय पक्षामध्ये जागावाटपासाठी बैठका सुरु आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग (Central Election Commission) लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा केव्हा जाहीर करणार? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहेत. अशातच आता एक मोठी माहिती समोर आली आहे. (Latest marathi news)

Ajit Pawar । पुण्यातल्या कोयता गँगला अजित पवार यांची थेट धमकी; म्हणाले, “आता डायरेक्ट…”

लोकसभेच्या निवडणुकीची तारीख 18 मार्च किंवा त्यानंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. (Lok Sabha Election Date) यापूर्वी 15 मार्च रोजी निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. तसेच या बैठकीत केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या (Central Election Commissioner) रिक्त जागा भरली जाणार आहे. 18 मार्च रोजी आचारसंहिता लागू केली जाणार आहे, अशी देखील माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Uddhav Thackeray । उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का! विश्वासू आमदाराने सोडली साथ, तर दुसऱ्या आमदाराची नाराजी जाहीर

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये तीन आयुक्त असून यापैकी एक मुख्य आयुक्त आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी इतर दोन आयुक्त असतात. पण या पूर्वी एक आयुक्तपद रिक्त होतं तर आता अरूण कुमार यांच्या राजीनाम्यानंतर दुसरे पदही रिक्त आहे. येणाऱ्या बैठकीत ही दोन्ही पदं भरली जाणार आहे, त्यानंतर लोकसभेचा कार्यक्रम जाहीर होईल.

Crime News । धक्कादायक! अहमदनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ

Spread the love