Lok Sabha Election । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटला नाही. अशातच आता भाजप हायकमांडने लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election 2024) टोकाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. (Latest marathi news)
CAA । निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने केली सर्वात मोठी घोषणा
वाशिम-यवतमाळच्या भावना गवळी, हिंगोलीचे हेमंत पाटील, हातकणंगलेचे धैर्यशील माने, उत्तर पश्चिमचे गजानन कीर्तिकर यांच्यासह इतर दोन खासदारांचा आगामी लोकसभा निवडणुकीत पत्ता कट होण्याची शक्यता आहे. कारण भाजपने (BJP) केलेल्या सर्वेमध्ये या खासदारांबद्दल जनतेमध्ये नकारात्मक भूमिका पाहायला मिळाली आहे.
Rohit Pawar । “आवाज दाबण्यासाठी मला जेलमध्ये टाकू शकतात”, कारवाईवरून रोहित पवारांनी व्यक्त केली भीती
त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत या खासदारांच्या जागी इतरांना उमेदवारी देण्याची अट भाजपने घातली आहे. भाजपच्या या अटीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नकार दिला आहे, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्याशिवाय जागावाटपाची चर्चा पुढे जाणार नाही अशी भूमिका भाजपने घेतली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
Crime News । पोलिसांनी हॉटेलमध्ये धाड टाकली अन् सुरु होत भलतंच, मुले-मुली नग्न अवस्थेत…