Lok Sabha Election । सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या जाहीर होणार, 7 टप्प्यात मतदान होण्याची शक्यता

Lok Sabha Election 2024 Date

Lok Sabha Election । लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखांच्या घोषणेची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती, ती आता संपणार आहे. वास्तविक, निवडणूक आयोगाने सांगितले आहे की ते लोकसभा निवडणूक 2024 आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा शनिवारी जाहीर करणार आहेत. आजच नवे निवडणूक आयुक्त सुखबीर संधू आणि ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारला आहे.

Ads

Amitabh Bachchan । चाहत्यांसाठी मोठी बातमी! अमिताभ बच्चन यांच्यावर पार पडली शस्त्रक्रिया, समोर आलं मोठं कारण

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाच्या आजच्या बैठकीत निवडणुका निष्पक्ष, शांततेत आणि चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी संवेदनशील भागात आणि राज्यांमध्ये किती फौजफाटा तैनात करायचा यावर चर्चा झाली. याशिवाय, किती टप्प्यांत निवडणुका घेता येतील आणि कोणत्या राज्यात आधी निवडणुका घेता येतील आणि कोणत्या राज्यांत निवडणुका नंतर घेता येतील, अशा विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली आहे. दोन्ही नवीन निवडणूक आयुक्तांनाही संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे.

Accident News । धक्कादायक! पुण्यात भरधाव टँकरची तरुणाला धडक, कॅमेऱ्यात कैद झाली अपघाताची भीषण दृश्य

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणूक 6 ते 7 टप्प्यात होऊ शकते. या कालावधीत आयोग राजकीय पक्षांना प्रचार आणि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 30 ते 32 दिवसांचा अवधी देऊ शकतो. पहिल्या टप्प्यातील निवडणुका 18 किंवा 20 एप्रिलला होऊ शकतात. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निकाल येऊ शकतात आणि त्यानंतर नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल.

Politics News । मोठी बातमी! अजित पवार गटाचा बडा नेता करणार शरद पवार गटाच्या वाटेवर, सिल्व्हर ओकवर…

Spread the love