Lok Sabha Election । सगळ्या देशाचं लक्ष असलेल्या लोकसभेच्या निवडणुकांची अखेर घोषणा झाली आहे. (Lok Sabha Election date) आज पत्रकार परिषद घेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajeev Kumar) यांनी लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. आगामी निवडणुकीत कशा प्रकारे तयारी केली जाईल याचीही माहिती यावेळी दिली आहे. (Latest marathi news)
देशात लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहेत. यातील पहिल्या टप्प्याचे मतदान 19 एप्रिलला होणार आहे तर 4 जूनला याचा निकाल लागणार आहे. दरम्यान, निवडणुकीच्या घोषणेनंतर देशभरात आजपासूनच आचार संहिता लागू झाली आहे. अशातच आता राजकीय पक्षांच्या बैठकांना देखील जास्त वेग येईल.
Maharashtra Politics । मविआच्या अडचणी वाढल्या! लोकसभेसाठी आणखी एका पुतण्यानं केलं काकांविरोधात बंड
देशात 97.8 कोटीपेक्षा जास्त मतदार असून यापैकी त्यामध्ये 49.7 कोटी पुरुष आणि 47.1 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. 1.82 कोटी नवीन मतदार आहेत. यावर्षी 82 लाख प्रौढ मतदार मतदान करतील तर 48 हजार तृतीयपंथीय मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी महत्त्वाची माहिती राजीव कुमार यांनी दिली आहे. यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.
नियम आणि अटी
- मिरवणूक काढणाऱ्या भागातील निर्बंध शोधा.
- मिरवणुकीचा वाहतुकीवर परिणाम होणार नाही, याची काळजी घ्या.
- मिरवणूक सुरू होण्यापूर्वी त्याची सुरुवात, मार्ग आणि समाप्तीची वेळ आणि ठिकाण याची आगाऊ माहिती पोलिसांना द्यावी लागणार.
- मिरवणुकीत शस्त्रे किंवा इतर हानिकारक साहित्य सोबत बाळगू नका.
- कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांच्या सूचना आणि सल्ल्याचे काटेकोरपणे पालन करा.
- रस्त्याच्या उजव्या बाजूने मिरवणूक काढा.