Lok Sabha Elections । सध्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लागणार आहेत यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यामध्येच आता राज्यातील काही महत्त्वाच्या राजकीय नेत्यांच्या नावांची देखील वेगवेगळी चर्चा झालेली आपला पाहायला मिळत आहे. यामध्येच आता बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या सुप्रिया सुळे यावर्षी अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
Aryan Arora । प्रसिद्ध अभिनेत्यावर केअर टेकरचा प्राणघातक हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत, १० टाके पडले
सुप्रिया सुळे अहमदनगर मधून निवडणूक लढवण्याच्या चर्चा सुरू होताच यावर अहमदनगरचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांची देखील प्रतिक्रिया समोर आले आहे. याबाबत बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले, “प्रतिस्पर्धी कुणीही असला तरी निवडणुकीला सामोरे जात असताना सुज्ञ जनता मोदींच्याच पाठीशी उभा राहील”, असे ते म्हणाले आहेत.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजप खासदार सुजय विखे यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र सुजय विखे पाटील यांनी देखील जनतेचा मोदींच्या कामावर विश्वास असल्याचे सांगत प्रतिस्पर्धी कुणी असला तरी निवडणुकीला सामोरे जाणार असे म्हणाले आहेत.
Viral Video । लंडनमध्ये जोरदार वाऱ्यामुळे विमानाचा तोल बिघडला, लँडिंग पाहून लोक हादरले