Ajit Pawar । आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या राज्यभर दौरे करत आहेत. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन अजित पवार हे थेट जनतेशी संवाद साधत आहेत. यावेळी अजित पवारांना वेगवेगळे प्रश्न देखील विचारले जातात. सध्या देखील अजित पवारांना बारामतीत तुमची कोणी लाडकी बहीण आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. (Breaking Political News)
या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, “राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असते. माझ्या सगळ्याच लाडक्या बहिणी आहेत आणि घरात राजकारण चालत मात्र राजकारण हे घरात शिरू द्यायचं नसतं. लोकसभा निवडणुकीत माझ्याकडून चूक झाली मी बहिणी विरोधात सुनेत्रा पवार यांना उभं करायला नको होतं. मात्र पार्लमेंट्री बोर्डकडून सुनेत्रा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे तो माघारी घेता येत नाही. मात्र माझं मन मला सांगते की तसं व्हायला नको होतं.” असं अजित पवार म्हणाले आहेत.
Ajit pawar । अजित पवार विधासभेला बारामतीतून पराभूत होतील; बड्या नेत्याचा दावा
त्याचबरोबर रक्षाबंधनच्या दिवशी आपण सुप्रिया सुळेंकडे का जाणार का? असा प्रश्न देखील अजित पवार यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, माझा सध्या राज्यभर दौरा सुरू आहे. पण मी जर राखी पौर्णिमेला बारामतीत असलो तर माझ्या बहिणी तिथे असतील तर मी नक्कीच जाईल असं उत्तर अजित पवार यांनी दिल.
Mumbai Crime । मुंबई हादरली! फक्त 30 रुपयांसाठी मित्रानेच केली मित्राची हत्या, नेमकं काय घडलं?