
Loksabha Election २०२४ । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. वंचितचे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अभिजीत राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अर्जात त्रुटी असल्याने उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अभिजीत राठोड यांचे निवडणूक लढवण्याचे स्वप्न भंगले आहे.

दरम्यान, राज्यातील लोकसभेच्या आठ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. 26 एप्रिलला अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ-वाशिम, वर्धा, हिंगोली, परभणी, आणि नांदेड या जागेसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 352 उमेदवारांनी 477 अर्ज दाखल केले होते.
Viral Video । नवराही पाहिजे आणि बॉयफ्रेंडही, ३ लेकरांची आई चढली चक्क विजेच्या खांबावर
४ एप्रिल अशी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. त्यानंतर आज ५ एप्रिल रोजी त्या अर्जांची छाननी झाली. यावेळी छाननीतून वंचित आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कारण या छाननी मध्ये अभिजीत राठोड यांचा अर्ज बाद झाला आहे.
Maharashtra politics । सर्वात मोठी बातमी! लोकसभेचं तिकीट जाहीर होताच शरद पवार गटाचा शिलेदार अडचणीत