Loksabha Election 2024 । मोठी बातमी! आढळराव पाटील करणार अजित पवार गटात प्रवेश

Ajit Pawar

Loksabha Election 2024 । लोकसभा निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तशा राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. सध्या देखील राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे शिल्लेदार माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचा अजित पवारांच्या उपस्थित आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Topers Ad

Ajit Pawar । अजित पवार यांना पुन्हा मोठा धक्का; घरातील जवळचा व्यक्ती गेला विरोधात

आपण शिरुर लोकसभा लढणार, हे याआधीच महायुतीत ठरलं होतं. असं आढळराव पाटील म्हणाले. शिरुर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील अशी लढत होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात सर्वांचे लक्ष लागले आहे. जरी आढळराव पाटील यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असला तरी आढळराव पाटील यांना उमेदवारी जाहीर होणार का? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Vijay Shivatare । बारामतीत मोठ्या घडामोडी, विजय शिवतारे यांचं सर्वात मोठं विधान

याबाबत बोलताना आढळराव पाटील म्हणाले, “2019 चा पराभव विसरलो. पराभवानंतर जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात मिसळुन कामे केली आहेत. पराभवानंतर पुन्हा लोकसभा लढणार हे मनात देखील नव्हतं. मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकसभा लढवण्यासाठीची संधी चालून आली, असं आढळराव पाटील म्हणाले आहेत.

Baramati Lok Sabha । अजितदादांची धक्कादायक बातमी; शिंदे गटानेही दर्शवला बारामतीत विरोध

Spread the love