Loksabha Election 2024। ब्रेकिंग! एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मोठा धक्का! भाजप त्या यादीतून नावे काढून टाकणार

Eknath Shinde And Ajit Pawar

Loksabha Election 2024 । जसजशा निवडणुका (Loksabha election) जवळ येऊ लागल्या आहेत, तसतसे राज्याचे राजकीय वर्तुळ चांगलेच तापत आहे. विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. प्रत्येक पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत तर काही ठिकाणी अजूनही उमेदवारीचा तिढा सुटलेला नाही. त्याचबरोबर प्रत्येक पक्षाकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्टार प्रचारकांची यादी जारी करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis । देवेंद्र फडणवीस यांनी केला सर्वात मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “मला मोदीजींनी…”

अनेक पक्षांच्या यादीमध्ये स्टार प्रचारक म्हणून आपल्या मित्र पक्षातील नेत्यांची नावं देखील आहेत. मात्र आता यासंदर्भात एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगाच्या नवीन निर्णयानुसार त्यांना आता अशा स्टार प्रचारकांची नावं वगळावी लागणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या तरतुदीनुसार स्टार प्रचारक हे निवडणूक लढविणाऱ्या पक्षाचेच सदस्य असायला हवेत.

Bjp । धक्कादायक बातमी! पुण्यामध्ये भाजपकडून आचारसंहितेचा भंग

दरम्यान भाजपने देखील स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे, या यादीमध्ये स्टार प्रचारक म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नावानेच समावेश आहे. मात्र आता निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही नावं काढून टाकावी लागणार आहेत.

Nana Patole । नाना पटोलेंची नाराजी महाविकास आघाडीला भोवणार? म्हणाले; “आघाडीचा धर्म…”

Spread the love