अगामी लोकसभा निवडणुका ( Loksabha Elections 2024) व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जवळ येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. ठाकरे गटाकडून देखील अगामी निवडणुकांच्या अनुषंगाने उमेदवारांच्या चाचपणीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत आज मातोश्री वर महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. (Important meeting from thackeray group)
Smuggling of gold । १० कोटी रुपयांच्या सोन्याची तस्करी; ‘या’ देशांतील महिलांचा समावेश
यासाठी दक्षिण मुंबई लोकसभा विभाग क्रमांक १२ चे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. तसेच कुलाबा, मलबार हिल, मुंबादेवी विधानसभा मतदार संघातील पुरुष आणि महिला पदाधिकाऱ्यांना सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही बैठक झाल्यानंतर रविवारी (ता.२१) ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार आहे.
लोकसभा निवडणुका २०२४ साठी ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीमध्ये २० जागांची मागणी करण्यात आली आहे. मात्र काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते समसमान जागा वाटपावर ठाम आहेत. दरम्यान महाविकास आघाडीने हा पेच सोडविण्यात लोकसभेच्या जागा वाटपाचा पार्श्वभूमीवर एक समिती स्थापन केली आहे.