Loksabha Election । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद शिवालय कार्यालयात पार पडत आहे. या पत्रकार परिषदेमधून महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. शिवसेना – 21, काँग्रेस – 17, राष्ट्रवादी – 10 असा फॉर्म्युला फिक्स करण्यात आला आहे. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्याचबरोवर इतर बडे नेते देखील उपस्थित होते.
Praniti Shinde । प्रणिती शिंदे यांना सर्वात मोठा धक्का; आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल
१) काँग्रेसच्या जागा: भंडारा अकोला,अमरावती, नागपूर, गडचिरोली चिमूर,चंद्रपूर, नांदेड, गोंदिया ,नंदुरबार, धुळे, जालना, सोलापूर, कोल्हापूर ,मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, रामटेक, उत्तर मुंबई अशा १७ जागा काँग्रेसला देण्यात आल्या आहेत.
२) राष्ट्रवादी शरद पवार गट- बीड, बारामती, शिरूर, सातारा, वर्धा, भिवंडी, दिंडोरी, माढा,रावेर, अहमदनगर या १० जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष लढवणार आहे.
३) ठाकरे गट: धाराशिव, यवतमाळ, मावळ, शिर्डी, नाशिक, रायगड, बुलढाणा, सांगली, मुंबई दक्षिण, कल्याण, हातकणंगले, हिंगोली, संभाजीनगर,सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई ईशान्य, पालघर, जळगाव, अशा २१ जागा शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आल्या आहेत.