दिल्ली : दिल्ली एक्साईज स्कॅम प्रकरणी अडचणीत आलेल्या सिसोदिया यांचा तणाव आणखीनच वाढला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्यासहीत 13 जणांविरोधात लुकआऊट नोटिस जारी करण्यात आले आहे. तसेच सिसोदिया यांना देश सोडून जाण्यासही मनाई करण्यात आली आहे. मद्य धोरणातील अनियमिततेबाबत सीबीआयने शनिवारी तीन आरोपींना मुख्यालयात बोलावून जबाब नोंदविले होते. त्यानंतर सिसोदिया यांच्यासह 15 जणांविरोधात एफ आय आर दाखल केला होता. मुंबईतील एंटरटेन्मेंट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे सीईओ विजय नायर वगळता ज्यांची नावे एफआयआरमध्ये आहेत, त्या सर्वांच्या विरोधात लूक आऊट नोटिस जारी करण्यात आली आहे. यामुळे सिसोदिया यांना देश सोडून बाहेर जाता येणार नाही. तसं केल्यास त्यांना अटक केली जाऊ शकते. त्यामुळे सिसोदिया आता अडचणींच्या घेऱ्यात सापडले आहेत.
Eknath Shinde : “मुंबईवर हल्ला करण्याची कोणी हिंमत करणार नाही” – एकनाथ शिंदे
गुन्हे अन्वेषण विभागाने सिसोदिया यांच्या घरी शुक्रवारी छापीमारी केल्यामुळे सर्वत्र खळबळ जनक वातावरण निर्माण झाले होते. सिसोदिया यांनी मात्र पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले होते. राजकीय सूडापोटी ही छापेमारी करण्यात आली असल्याचा त्यांचा दावा होता. काल पुन्हा सिसोदिया यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्याला लवकरच अटक केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली आहे. शिक्षण क्षेत्रात चांगले काम करत असलेल्या दिल्ली सरकारला ब्रेक लावण्यासाठी केंद्र सरकार चा खटाटोप चालू असल्याची टीका देखील त्यांनी केले.
CBI छापों के बारे में मोदी जी के इस बयान को ज़रूर सुने. अगर नहीं सुना तो आप एक बहुत बड़े सच को जानने से वंचित रह जाएँगे. https://t.co/6HptTsnVRH
— Manish Sisodia (@msisodia) August 21, 2022
लुकआऊट नोटिस जारी केल्यानंतर सिसोदिया यांनी मोदींचा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यावर त्यांनी एक कॅप्शन दिलं आहे. “हळूहळू वातावरण बदलतं हे माहीत होतं. पण तुमच्या वेगापुढे हवाही अचंबित आहे” अशा पद्धतीचे ट्विट करून सिसोदिया यांनी मोदींवर उपरोधिक टीका केली आहे.
Asia Cup : आशिया कपमध्ये शाहीन आफ्रिदीची जागा घेणार ‘हा’ खेळाडू ; वाचा सविस्तर