यंदा ऊसाचे कारखाने (Sugar Factory) जोमाने सुरू आहेत. जवळपास सर्वच कारखान्यांमध्ये गाळप हंगाम चालू आहेत. हा गाळप हंगाम संपण्यास अजूनही अवधी आहे. दरम्यान ऊस तोडण्यासाठी शेतकऱ्यांकडून जाणूनबुजून अडवणूक करून पैसे घेतले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे.
आमदार फुटणार उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी आधीच दिली होती माहिती; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
अनेक ठिकाणी साखर कारखान्याकडून लवकरात लवकर ऊस तोडणी यावी. यासाठी शेतकरी मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर मुकादम शेतकरी पैशाची मागणी करत आहेत. असा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
अमूलच्या दूध दरात प्रतिलिटर तीन रुपयांनी वाढ
याबाबत आमदार संदीपान भुमरे Sandipan Bhumre) यांनी दखल घेत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी ऊस उत्पादकांकडून केली जात आहे. गाळप हंगाम संपण्यास अजूनही अवकाश असल्याने कारखाने सुरू आहेत. मात्र अवधी असून देखील शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन पिळवणूक केली जात आहे.
बिग ब्रेकिंग! मुंबईवर हल्ला करण्याची धमकी, NIA ला आला धमकीचा ईमेल
पैठण तालुक्यातील ऊस उत्पादकांना याची मोठी झळ बसली आहे. या परिसरात ऊस देखीक भरपूर प्रमाणात असल्याने आपला ऊस तुटून जाईल की नाही अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. यामुळे शेतकरीदेखील पर्याय नसल्याने ऊसतोडणीसाठी पैसे देत आहेत. ऊसाची नोंद कारखान्यात असून देखील मुकादम स्वतःच फडांचे दर ठरवताना पहायला मिळत आहेत.