Tomato Price Hike | टोमॅटोमुळे लागली लॉटरी! दिवसाला चक्क 18 लाखांची कमाई

Tomato Price Hike | Lottery due to tomatoes! 18 lakhs earnings per day

Tomato Price Hike | यंदा टोमॅटोला चांगला भाव (Tomato Price) मिळाला आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच चांदी होत आहे. टोमॅटोचे दर गगनाला भिडल्याने (Tomato Price Hike) घराघरात त्याचीच चर्चा आहे. याचा फायदा जरी शेतकऱ्यांना होत असला तरी सर्वसामान्यांना त्याचा खूप मोठा फटका बसला आहे. त्यांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन टोमॅटो (Tomato) खरेदी करावा लागत आहे. टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्याने त्यावरून भांडणे झाल्याच्याही घटना समोर येऊ लागल्या आहेत. (Latest Marathi News)

Amruta Fadnavis । अमृता फडणवीस पुन्हा चर्चेत; ‘त्या’ फोटोंमुळे झाल्या ट्रोल

याच टोमॅटोमुळे अनेक शेतकऱ्यांचे करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. पाचघर गावचे रहिवासी असलेले तुकाराम गायकर (Tukaram Gaikar) यांनी टोमॅटो विक्रीतून करोडो रुपये कमावले आहेत. या गावात 12 महिने मुबलक प्रमाणात पाणी असल्याने या गावातील शेतकरी प्रामुख्याने कांदा आणि टोमॅटोचे पीक घेतात. गायकर कुटुंबाने 18 एकर बागायती शेतीपैकी 12 एकरवर टोमॅटोची लागवड केली आहे.

नाट्यमय घडामोडीनंतर खाते वाटप जाहीर! जाणून घ्या अजित पवार यांच्यासह कोणाला कोणते खाते मिळाले

त्यांनी आतापर्यंत एकूण 13 हजार कॅरेट टोमॅटोची बाजारात विक्री केली असून त्यातून त्यांना सव्वा कोटीपेक्षा जास्त रुपयाचे उत्पादन मिळाले आहे. जर टोमॅटोच्या भावाचा विचार केला तर सध्या नारायणगाव टोमॅटो मार्केटमध्ये एका क्रेटला 2100 रुपयांचा दर (Tomato Rate) देण्यात येत आहे. नुकतेच या कुटुंबाने 900 कॅरेटची विक्री केली असून त्यातून त्यांना तब्बल 18 लाख रुपये मिळाले आहेत.

सर्वात मोठी बातमी! शरद पवारांच्या पत्नी शस्त्रक्रियेसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

एकेकाळी कवडीमोल भावाने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोने शेतकऱ्यांना यंदा चांगले दिवस आणले आहेत. त्यामुळे यावर्षी फक्त गायकर कुटुंबीय नाही तर त्यांच्यासारखी अनेक कुटुंबे कोट्याधीश झाली आहेत. परंतु टोमॅटोच्या भाववाढीमुळे गुन्ह्यात वाढ होत आहे.

दोन दिवसानंतर मुलाचं लग्न, नाचताना गाठले मृत्यूने; क्षणात झाल होत्याचं नव्हतं, पाहा व्हायरल व्हिडिओ

Spread the love