Site icon e लोकहित | Marathi News

LPG Gas Cylinder Price । गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ; सर्वसामान्यांसाठी महागाईची चिंता

LPG Cylinder Price

LPG Gas Cylinder Price । सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. आजपासून लागू होणाऱ्या नवीन दरानुसार, १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३९ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे व्यावसायिक गॅस सिलिंडरची नवीन किंमत १ हजार ६९१ रुपये झाली आहे. तेल कंपन्यांनी ही दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला असून, यासंबंधीची माहिती इंडिया टुडेने दिली आहे.

Ajit Pawar । बिच्चारे अजितदादा… 60 जागांवर आले, बड्या नेत्याची खरमरीत टीका

या वाढीमुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना आणि सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा फटका बसणार आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत सध्या कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

Harshwardhan Patil । राजकारणातून सर्वात मोठी बातमी! हर्षवर्धन पाटलांनी जिल्हा अधिवेशनाला दांडी मारली

जुलैमध्ये, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ३० रुपयांची कपात करण्यात आली होती, ज्यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला होता. पण सप्टेंबरमध्ये पुन्हा दरवाढ झाल्यामुळे, खर्चाचे नियोजन करणाऱ्यांसाठी हा महागाईचा धक्का आहे. महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक गोष्टींमध्ये बदल होत असतो, ज्यामध्ये आता व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांना तसेच व्यावसायिकांना खर्चाच्या नियोजनात अडचणी आल्या आहेत.

Badlapur case । बदलापूर अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर!

Spread the love
Exit mobile version