LPG Gas Cylinder Price Cut Today | आज 1 जानेवारी 2025 रोजी नववर्षाच्या प्रारंभामध्ये ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आलेली आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी 19 किलोग्रॅम वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 14.50 रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांना मोठा फायदा होईल, कारण व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर कमी झाले आहेत.
Prajkta Mali । प्राजक्ता माळींनी सुरेश धसांना सुनावलं, म्हटलं- “महिलांची अब्रू उडवणं योग्य नाही”
दिल्लीतील नवीन दरानुसार, 19 किलोग्रॅम वजनाचा व्यावसायिक गॅस सिलिंडर आता 1804 रुपयांना मिळणार आहे, तर मुंबईत त्याची किंमत 1756 रुपये, चेन्नईमध्ये 1966 रुपये आणि कोलकातामध्ये 1911 रुपये आहे. मागील काही महिन्यांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत सलग वाढ झाल्याने ही कपात व्यवसायिकांसाठी महत्त्वाची आहे.
तथापि, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती गॅस सिलिंडरचे दर दिल्लीमध्ये 803 रुपये, मुंबईत 802.50 रुपये, चेन्नईमध्ये 818.50 रुपये आणि कोलकातामध्ये 829 रुपये आहेत. गेल्या वर्षी मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरचे दर 100 रुपयांनी कमी झाले होते, आणि त्यानंतर या दरात कोणताही बदल झालेला नाही.
Dr. Manmohan Singh । माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, संपूर्ण देशात 7 दिवसांचा दुखवटा
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना गॅस सिलिंडरच्या दरात सवलत मिळाल्याने त्यांचे मनोबल वाढले आहे, तर व्यावसायिकांसाठीही हे स्वागतार्ह आहे.
Sharad Pawar । मोठी बातमी! निवडणुकीतील पराभवानंतर शरद पवार घेणार मोठा निर्णय