
देशात दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. पेट्रोल, डिझेल सोबत आता घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती सुद्धा अगदी गगनाला भिडल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे. महाग गॅस सिलिंडरमुळे ( LPG Gas Cylinder) आजही देशातील कित्येक घरात चुलीवर स्वयंपाक केला जातो. ग्रामीण भागातील गरीब लोकांना गॅस सिलिंडर विकत घेणे परवडत नाही.
शरद पवार यांच्या घरी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? जयंत पाटील म्हणाले…
दरम्यान अशा लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारने एक नवीन योजना आणली आहे. या योजने अंतर्गत देशातील गरीब नागरिक अत्यंत कमी किंमतीत गॅस सिलिंडर खरेदी करू शकतात. यामुळे नागरिकांच्या पैशाची सुद्धा बचत होणार आहे. देशातील गरीब नागरिकांना आता फक्त ५०० रुपयांत गॅस सिलिंडर मिळणार आहे.
दोन विषयात नापास! विद्यार्थीनीने तणावाखाली उचलले चुकीचे पाऊल; नाल्यात सापडला मृतदेह
सध्या भारतामध्ये LPG गॅस सिलेंडरची किंमत 1150 रुपये आहे. मात्र, देशातील BPL कार्डधारक आणि PM उज्ज्वला योजनेशी संबंधित कुटुंबांना एलपीजी सिलिंडर फक्त 500 रुपयांमध्ये दिले जात आहेत. तुम्ही सुध्दा BPL कार्ड धारक असाल तर नक्कीच या योजेनचा लाभ घेऊ शकता.
आज देश कितीही पुढे गेला असला तरी ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागते. अशातच महागाई वाढल्याने या लोकांना हव्या असणाऱ्या सर्वच सोयी सुविधांचा लाभ घेता येत नाही. मात्र अशा योजना जाहीर झाल्याने या लोकांना दिलासा मिळत आहे.
Gautami Patil | गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे नियोजन करणे पडले महागात! पोलिसांनी केली कारवाई