LPG Price । सर्वसामान्यांना सतत महागाईचा (Inflation) सामना करावा लागत आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्य लोक हैराण झाले आहेत. तरीही महागाई आटोक्यात आली नाही. दार महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलिंडरच्या दरात (LPG cylinder rates) होते. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलिंडरचे दर पुन्हा एकदा महाग (LPG cylinder rates hike) झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना सरकारचा मोठा धक्का बसला आहे. (Latest marathi news)
मुंबईसह अहमदाबाद, मेरठ, इंदूर, लखनौ, दिल्ली, जयपूर,आग्रा संपूर्ण देशात सिलिंडरचे दर महाग (LPG Price Hike) झाले आहे. पण हे लक्षात घ्या की 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढले असून मागील ऑगस्टपासून 14.2 किलो घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर ग्राहकांना दिलासा दिला आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचे दर जैसे थे आहेत.
Ajit Pawar । बिग ब्रेकिंग! शिंदे गटाचा बडा नेता अजित पवार गटात जाणार?
दरम्यान, आजपासून दिल्ली आणि मुंबईत एलपीजी सिलिंडर 25.50 रुपयांनी महाग झाले आहेत. कोलकात्यात 24 रुपये आणि चेन्नईमध्ये 23.50 रुपयांची वाढ झाली आहे. तेल विपणन कंपन्यांकडून आज LPG ते ATF दर अपडेट केले आहेत. नवीन दरानुसार आज दिल्लीमध्ये व्यावसायिक सिलिंडर 1769.50 रुपयांऐवजी 1795 रुपये, कोलकातामध्ये सिलिंडर 1887 रुपयांऐवजी 1911 रुपये, मुंबईत व्यावसायिक सिलेंडरचे दर 1749 रुपये झाले असून चेन्नईत हे दर 1960 रुपये झाले आहे.