LPG Price Reduced । आनंदाची बातमी! गॅस सिलिंडरचे दर कमी झाले; ‘इतक्या’ रुपयांनी घसरले भाव

LPG Price Reduced

LPG Price Reduced । LPG सिलेंडर ग्राहकांना आज सकाळी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. यानंतर आता 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या ग्राहकांना प्रत्येक सिलिंडरवर सुमारे 40 ते 40 रुपयांचा नफा मिळणार आहे. तर घरगुती एलपीजी सिलिंडरच्या बाबतीत, किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. (LPG Price Reduced)

Viral Video । प्री-वेडिंग फोटोशूटदरम्यान आला साप, घाबरून जोडप्याने केलं असं कृत्य की..व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

हा दिलासा सर्वसामान्यांना लोकांना नसून छोटे दुकानदार आणि हॉटेलमालकांना देण्यात आला आहे. फक्त व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरातच कपात करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर ३९.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे. आपण जर घरगुती गॅस सिलेंडर बाबत पहिले तर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. साधारणत: गॅस सिलिंडरच्या दरात महिन्याच्या पहिल्या तारखेला बदल केला जातो मात्र यावेळी ख्रिसमस सणाच्या आधीच गॅसचे दर कमी करण्यात आले आहेत.

Poonch Terrorist Attack । मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनांवर हल्ला, 5 जवान शहीद

अपडेटनुसार, सरकारी तेल विपणन कंपन्यांनी म्हणजेच OMC ने 19 किलो LPG सिलिंडरची किंमत 39.50 रुपयांनी कमी केली आहे. तेल विपणन कंपन्यांनी म्हटले आहे की व्यावसायिक सिलिंडरच्या नवीन किंमती आजपासून म्हणजेच 22 डिसेंबरपासून लागू झाल्या आहेत. म्हणजेच आजपासून देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत कमी झाली आहे.

Jitendra Awhad । ‘अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आनंद होईल, पण…’, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे मोठे वक्तव्य

Spread the love