मुंबई : कोरोना महामारीनंतर गेल्या काही दिवसांपासून लंपी रोगाने (Lumpy disease) राज्यासह देशात थैमान घातले आहे. दरम्यान या रोगामुळे अनेक जनावरांना (animals) आपला जीव गमवावा लागलाय. जनावरांच्या मृत्युमुळे (dies) अनेक शेतकऱ्यांना (farmers) फटका बसत आहे. त्यामुळे या लंपी रोगापासून जनावरांची काळजी घेणे महत्वाचे आहे. नाहीत तर या रोगाला आणखी जनावरे बळी पडतील.
‘अशा’ पद्धतीने करा जनावरांचे पालन, मोठ्या आजारांपासून राहतील दूर
यावर आता उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान या रोगाला घेऊन आता काही लोकांनी अफवाही पसरवल्या आहेत. लंपी रोग जनावरांना होतोय आणि जनावरांच्या दूधापासून माणसांनाही या आजाराची लागण होते अशी अफवा आता पसरत आहे. यामुळे लोकांसमोर दूध प्यावे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच अफवेला राजस्थान राज्य बळी पडताना दिसले आहे.
कांद्याचा बाजारभाव कोलमडला, तरीही राज्यात कंद्याची लागवड मोठ्या प्रमाणात
राजस्थानातील अनेक गावांमध्ये तर नागरिकांनी दूध पिणेच बंद केले आहे. यामुळे येथे शहरी भागातील (Milk supply) दूध पुरवठ्यावर देखील याचा परिणाम झाला आहे. दरम्यान प्रशासनाने लोकांना लम्पीग्रस्त जनावरांच्या दूधापासूनही माणसांना कोणताही धोका नाही. पण कच्चं दूध न पिता नेहमी उकळून पिण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच तनागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहनही प्रशासनाकडून केले जात आहे.
खरतर लंपी हा संसर्गजन्य रोग असला तरी माणसांना त्याचा काही धोका नाही. पण महत्वाची बाब म्हणजे लम्पीग्रस्त जनावराची धार काढताना हातमोजे, मास्क वापरणे गरजेचे आहे. ही काळजी घेतली तर लंपी आजारापासून इतर जनावरे सुरक्षित रहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनावरांमधील लंपी या साथीच्या रोगाला आळा घालण्यासाठी एक मोठी घोषणा केली आहे. यामध्ये भारतामधील शास्त्रज्ञांनी लम्पी रोगावर लस तयार केली आहे. त्यामुळे जनावरांना या आजपासून मुक्त करता येईल.
पशूसंवर्धन विभागाने आतापर्यंत लाखोंहून अधिक जनावरांना या विषाणूची लागण झाल्याचे सांगितले आहे. खरतर लंपी रोगाची पहिली प्रकरणे राजस्थान आणि गुजरातच्या सीमेला लागून असलेल्या प्रदेशात नोंदवली गेली. त्यानंतर काही महिन्यांतच त्वचेचा रोग देशाच्या १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पोहोचला आहे.यामध्ये हजारो जनावरांचा मृत्यू झाला आहे तर ११ लाखांहून अधिक संक्रमित जनावरे समोर आली आहेत.
खुशखबर! आता फक्त 750 रुपयांमध्ये मिळणार गॅस सिलिंडर ; आजच करा बुकिंग