मुंबई : कोरोना महामारीनंतर गेल्या काही दिवसांपासून लंपी रोगाने (Lumpy disease) राज्यासह देशात थैमान घातले आहे. दरम्यान या रोगामुळे अनेक जनावरांना (animals) आपला जीव गमवावा लागलाय. जनावरांच्या मृत्युमुळे (dies) अनेक शेतकऱ्यांना (farmers) फटका बसत आहे. महाराष्ट्रात लम्पी आजार मोठ्या प्रमाणात पसरतोय. कृषीमंत्र्यांच्या मतदार संघातून आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड तालुक्यातील एका गावात जवळपास 10 जनावर लम्पी आजारानं दगावली आहेत.
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! भाजीपाल्यांचे दर भिडले गगनाला; वाचा सविस्तर
उंडणगावमधील ही घटना असून. गावातील अनेक जनावरांना या आजाराची लागण झाली असून १० जनावरांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील जवळपास 22 जिल्ह्यांतील 396 गावांमध्ये लम्पीचा प्रसार झालाय. यामुळे प्रशासनाने गुरांचे बाजार भरवण्यावर देखील बंदी घातली आहे. तर या आजाराने हजारो जनावरांचा मृत्यू झाला आहे तर ११ लाखांहून अधिक संक्रमित जनावरे समोर आली आहेत.
दरम्यान, भारतीय शास्त्रज्ञांनी लम्पी रोगावर लस तयार केली आहे. तसेच या लसीकरणाबरोबरच जनावरांच्या तपासणी चाचण्यांना वेग देऊन जनावरांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. यावरून लम्पी हा आजार अटोक्यात आणला जाईल. 2025 पर्यंत देशातील प्रत्येक जनावराला तोंडाच्या आणि पायाच्या आजावर लस दिली जाणार असल्याचे नोएडामध्ये वर्ल्ड डेअरी सिमिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.भारतीय शास्त्रज्ञांनी लम्पी रोगावर लस तयार केली आहे. तसेच या लसीकरणाबरोबरच जनावरांच्या तपासणी चाचण्यांना वेग देऊन जनावरांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. यावरून लम्पी हा आजार अटोक्यात आणला जाईल. 2025 पर्यंत देशातील प्रत्येक जनावराला तोंडाच्या आणि पायाच्या आजावर लस दिली जाणार असल्याचे नोएडामध्ये वर्ल्ड डेअरी सिमिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.