मागच्या काही दिवसामध्ये लंम्पीने संपूर्ण जगावरती थैमान घातलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांचे गाई, म्हशी व इतर प्राणी मरण पावत होते. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला होता. त्यावरती सरकारने लगेचच उपाययोजना करून लम्पीवर आळा (Stop at Lumpy) घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनतर लंम्पी कमी देखील झाला. मात्र आता लंम्पीने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
महाराष्ट्रातील गोंदिया (Gondia) जिल्ह्यामधील चिखली या ठिकाणी तीन जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात लम्पी रोगाची साथ (Lumpy disease syndrome) सुरू झाल्याने सर्व शेतकरी चिंतेत असून भीतीचे वातावरण निर्माण झालेल आहे. चिखलीमध्ये पशुसंवर्धन प्रकल्प (Animal Husbandry Project) असल्याने प्राण्यांची काळजी घेण हे एक नागरिकांसमोर आव्हानच ठरले आहे. जे प्राणी लम्पी बाधित प्राणी आहेत त्यांच्या बाबतीत विशेष काळजी घेतली पाहिजे.
१. ज्या प्राण्यांचा लम्पी होऊन मृत्यू झाला आहे त्या प्राण्यांना मोकळ्या जागेत न सोडता पुरून टाकले पाहिजे.
२. गोठ्यामध्ये कीटकनाशकाची फवारणी करून घ्यावी.
३. लंबी झालेल्या जनावरांच्या सानिध्यात इतर जनावरे येऊ नये याची काळजी घ्यावी.
४. बाधित जनावरांना पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले पाहिजे.
५. लंम्पी झालेल्या जनावरांच्या चाऱ्याची व पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था केली पाहिजे.