मुंबई : पशुंना होणाऱ्या लम्पी रोगाने (Lumpy disease) राज्यात धुमाकूळ घातला आहे. यामुळे अनेक जनावरे (animals) दगावली आहेत. दरम्यान शेतकऱ्यांना (farmers) मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. देशात लम्पीमुळे आतापर्यंत एकूण 82 हजार जनावरांचा मृत्यू झालाय. तर, राज्यात आतापर्यंत 187 जनावरे या आजाराचे बळी गेले आहेत. लम्पीला रोखण्यासाठी देशभरात लम्पीच्या (lumpy-skin-disease) लसीकरणाला देखील वेग येत आहे.
हे करा उपाय-
१. लंपीची लागण झालेल्या जनानरांना वेगळे ठेवा. त्यांना इतर गोठ्यातील जनावरांमध्ये ठेऊ नका.
२. जनावरांना गोचीड झाल्यास लवकरात लवकर ते मारून टाका. त्याचबरोबर माश्या डास यांचा देखील नायनाट करा.
३. जनावराचा मृत्यु झाल्यास मृतदेह पुरून टाकावा किवा जाळून टाकावा.
४. संपुर्ण गोठ्यात कीटकनाशक फवारणी करावी.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना! ‘या’ महिन्यापर्यंत मिळणार मोफत धान्य
पशुपालकांनो अशी घ्या काळजी-
जनावरांमध्ये लंपी रोगाची लक्षणे आढळण्यात लवकरात लवकर जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना संपर्क करावा तसेच टोल फ्री क्रमांक 180023301 किंवा राज्यस्तरीय कॉल सेंटरमधील पशु सेवेचा टोल फ्री क्रमांक 1962 यावर संपर्क साधावा.
Raj Kundra: “…त्यांनी तोंड बंद ठेवावं”,पॉर्नोग्राफी प्रकरणातील राज कुंद्राची पोस्ट चर्चेत
लक्षणे-
जनावरांचे खाण्याचे प्रमाण कमी होते, ताप येतो, डोळ्यातून पाणी येते, लसिकाग्रंथीं सुजतात, दूध उत्पादन कमी होते, पोट, मानेवर, कास, डोके या भागातील त्वचेवर दहा ते पंधरा एम एम व्यासाच्या गाठी येतात.