Lumpy infectious disease । कोल्हापूर : काही दिवसांपूर्वी देशासह महाराष्ट्रातही जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव वाढला होता. अनेक जनावरांना हा आजार जडला होता. त्यामुळे पशुपालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. जनवारांच्या गोठ्यातील माशी, गोमाशी आणि घाणीमुळे या आजाराची लागण होते. हा आजार काही प्रमाणात आटोक्यात आला होता.
परंतु पुन्हा एकदा या आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे पशुपालकांच्या चिंतेत भर पडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील राशिवडेत येथे या आजाराने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. आजाराने चार जनावरांचा बळी घेतला आहे. जिल्ह्यात पुन्हा लम्पीचा शिरकाव झाल्याने प्रशासन सतर्क झाले असून प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण, औषध फवारणी केली जात आहे.
तसेच मागील काही दिवसांपूर्वी कागल, भुदरगड आणि करवीर तालुक्यातील जवळपास ३० ते ४० जनावरांना या आजाराची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी जनावरे खरेदी-विक्री करू नये, असे आवाहन पशुवैद्यकीय विभागाकडून केले आहे. परंतु यामुळे पशुपालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Tourist Place । स्वर्गापेक्षा कमी नाहीत ही ठिकाणे, पावसाळ्यात नक्की द्या भेट