मागील काही महिन्यांपासून राज्यात लम्पी या आजाराने थैमान घातले होते. जनावरांच्या त्वचेवर होणारा हा रोग आहे. दरम्यान या रोगावर प्रतिबंधक ‘लम्पी प्रोव्हॅक’ ( Lumpi Provac) या लसीचे उत्पादन आता पुण्यात होणार आहे. नागपूरमधील ( Nagpur) एका कार्यक्रमात हा निर्णय घेण्यात आला असून पुढील 10 वर्ष या लसीचे व्यावसायिक उत्पादन घेण्याचा अधिकार महाराष्ट्राला देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन विभागाच्या पुण्यातील पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्थेकडे या लसीचे तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यात आले आहे.
Amruta Fadanvis: अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं रिलीज
नोव्हेंबर 2023 पासून या लसीच्या उत्पादनाला सुरुवात होणार असल्याची शक्यता आहे. केंद्रीय संस्थांनी ही लस विकसित केली असून या लसीचे तंत्रज्ञान देशात सर्वप्रथम पुण्यातील पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्थेकडे देण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्यातील एक कोटी 40 लाख जनावरांना ही लस दिली जाणार आहे. याशिवाय इतर राज्यात देखील ही लस पुण्यातून पोहोचवण्यात येणार आहे.
मोठी बातमी! आयपीएलनंतर ऋषभ पंत वनडे वर्ल्ड कप मधून बाहेर?
राज्यात लम्पी आजार पसरण्यास सुरुवात झाली तेव्हापासून पुणे ( Pune)जिल्ह्यात लसीकरणावर भर दिला गेला आहे. यामुळे येथील पशुंचे मृत्यू रोखण्यात जिल्हा परिषदेला यश आले आहे. यामुळे पुणे जिल्हा लम्पीमुळे झालेल्या मृत्यूंच्या संख्येत बाराव्या क्रमांकावर आहे. याशिवाय आता पुण्यातच लसीचं उत्पादन होणार असल्याने येथील पशुउत्पादकांना आणखी दिलासा मिळणार आहे.
अजामीनपात्र वॉरंट जारी होताच संजय राऊतांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…