Madha Loksabha । मागील काही दिवसांपासून माढा लोकसभा मतदारसंघ (Madha Lok Sabha Constituency) खूप चर्चेत येत आहे. याला कारणही अगदी तसेच आहे. महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा लोकसभेतून उमेदवारी देण्यात आली आहे. माढ्यात दररोज नव्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत.
Ajit Pawar । ब्रेकिंग! अजित पवार यांचा लोकसभेचा अर्ज नामंजूर
सध्या देखील या ठिकाणाहून एक मोठी बातमी समोर आली आहे. माढ्याचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी महाविकास आघाडीचे धैर्यशिल मोहिते पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतल्याने नवीन ट्वीस्ट निर्माण झाला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. , माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशिल मोहिते पाटील आणि भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांच्यामध्ये लढत होणार आहे. सध्या धैर्यशिल मोहिते पाटील यांना पाठिंबा वाढताना दिसताच रणजितसिंह निंबाळकर यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतल्याची माहिती समोर आली आहे.
आपल्या उमेदवारी अर्जामध्ये धैर्यशिल मोहिते पाटील यांनी शेती, व्यवसाय, नोकरीचा तपशील दिला नसल्याचा आक्षेप रणजितसिंह निंबाळकर यांनी घेतला आहे. दरम्यान आता यावर आज दुपारीच सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीत काय निर्णय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.