Maratha Reservation । बीड : मराठा समाज हा आरक्षणासाठी (Beed Maratha Reservation) खूप आक्रमक झाला आहे. जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. याच मागणीसाठी मागील काही दिवसांपासून मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला अल्टिमेटम दिला होता. तो आज संपणार आहे. त्यामुळे जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)
Shiv Sena Clash । ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा सामनेसामने, ‘त्या’ वक्तव्याने तापलं वातावरण
मनोज जरांगे पाटील यांच्या सभेपूर्वीच एक धक्कादायक घटना घडली आहे. बीडमध्ये एका ५० वर्षीय व्यक्तीने गळफास घेतला आहे. बीडमधील बार्शी नाका (Barshi Naka) परिसरामध्ये शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे. मधुकर शिंगण असे आत्महत्या केलेल्यांचे नाव आहे. त्यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली आहे, त्यात “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राम राम… मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. मी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करीत आहे. मनोज जरांगे पाटील हे चांगलं काम करत आहेत. त्यांनी माझ्या कुटुंबाला भेट द्यावी, अशी मागणी केली आहे.
आरक्षण जाहीर करावं अन्यथा…
त्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सरकारने (Government) तातडीने आरक्षण जाहीर करावं, शिंगण कुटुंबियांना सरकारी मदत देखील द्यावी. नाहीतर मोठं आंदोलन केलं जाईल, असा इशारा मराठा बांधवांनी दिला आहे. अल्टिमेटम संपण्यापूर्वी जरांगे पाटील आज बीडमध्ये सभा घेणार आहे. मनोज जरांगे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याशिवाय सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार का? हे देखील पाहणे महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे.
मराठा समाजाच्या या सभेपूर्वी बीडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भव्य रॅली निघणार आहे. ही रॅली सुभाष रोड मार्गे अण्णाभाऊ साठे चौकात येईल, तिथून अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण करून रॅली जालना रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात येईल. तिथे मनोज जरांगे मराठा समाजाला संबोधित करणार आहे.