बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) अनेक चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. तिने स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. बॉलीवूडची धक धक गर्ल म्हणून माधुरी दीक्षितला ओळखल जात. फिल्मी दुनियेत कमी सक्रिय असली तरी माधुरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. अभिनेत्री नेहमीच तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल चर्चेत असते. सध्या ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
शीतल म्हात्रे यांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओप्रकरणी आदित्य ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री माधुरी एके काळी क्रिकेटर अजय जडेजाच्या प्रेमात पडली होती. ९० च्या दशकामध्ये क्रिकेटर अजय जडेजा आणि माधुरी दीक्षित यांच्या अफेअरच्या बातम्या सतत चर्चेत होत्या. त्यांनतर अजय जडेजा एका चित्रपट काम करणार होता. मात्र त्याच्या एका चुकीमुळे त्याला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली नाही. यानंतर त्याच्या घरच्यांनी त्याला क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज आणि उद्या ‘या’ ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता!
अजय जडेजा एका राजघराण्यातील मुलगा होता आणि माधुरी दीक्षित मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबातील होती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना त्यांचे एकत्र राहणे मान्य नव्हते म्हणून अजय जडेजा आणि माधुरीचा १९९९ मध्ये ब्रेकअप झाला. त्यांनतर माधुरीने देखील अजय जडेजासोबतचे सर्व संबंध तोडले. आणि श्रीराम माधव नेने यांच्याशी लग्न केले व काही काळासाठी ती अमेरिकेला देखील शिफ्ट झाली होती.
बिग ब्रेकिंग! शीतल म्हात्रे यांचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी दोन जणांना अटक