Site icon e लोकहित | Marathi News

गौतमी पाटीलच्या डान्सवर माधुरी पवारची प्रतिक्रिया, म्हणाली, “तर कलाकाराच्या कलेचा आदर…”

Madhuri Pawar reacts to Gautami Patil's dance, saying, "So respect for the artist's art..."

दिवसेंदिवस लावणी कलाकार गौतमी पाटील ( Gauatami Patil) हिच्या चर्चा वाढतच आहेत. महाराष्ट्रात सध्या लावणी म्हंटल की गौतमी पाटील हेच नाव पुढे येत आहे. लावणी करण्याच्या अनोख्या पद्धतीने प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी राज्यातील विविध संघटनांकडून होत आहे.

अंत्ययात्रेत ‘राम नाम सत्य है’ का म्हणतात तुम्हाला माहित आहे का? वाचा सविस्तर

गौतमी पाटील नाचताना अश्लील हालचाली करते. असा आरोप तिच्यावर ठिकठिकाणी केला जात आहे. दरम्यान तिच्या कार्यक्रमांमध्ये चुकीच्या घटना घडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. इतकंच नाही तर गौतमी पाटीलच्या डान्सचे सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ संस्कृतीला धक्का लावणारे आहेत. असेही म्हंटले जात आहे.

ऋषभ पंत पुन्हा क्रिकेट खेळू शकणार का?

या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेत्री व लावणी कलाकार माधुरी पवार ( Madhuri Pawar) हिने नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ती म्हणाली की, “एका कलाकाराने दुसऱ्या कलाकारावर बोट दाखवू नये. परंतु सध्या राज्यात जे काही सुरू आहे ते कलेचे विभत्स रूप आहे.”

एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर वार; म्हणाले, “अडीच वर्षे बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा आणि…”

दिवसरात्र मेहनत केल्यानंतर यश मिळते. खूप दिवस काम केल्यानंतर लोकांच्या मनात कलाकाराच्या कलेचा आदर येतो. त्यातल्या त्यात फेमस होणे ही वेगळी गोष्ट असून एका दिवसात प्रसिद्धी मिळत नाही. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. सध्या गौतमी पाटीलकडून जे नृत्य सुरू आहे ते चुकीचे असून लवकरात लवकर तिच्या कार्यक्रमांवर बंदी घालावी अशी मागणी माधुरी पवार हिने केली आहे.

ऋषभ पंतन स्वतः सांगितला अपघात नेमका कसा झाला? म्हणाला…

Spread the love
Exit mobile version