Madhya Pradesh । सर्वात मोठी बातमी! उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, पुजाऱ्यासह 13 जण होरपळले

Madhy Pradesh

Madhya Pradesh । मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाल मंदिरात सोमवारी सकाळी मोठा अपघात झाला. गर्भगृहात होळीच्या दिवशी भस्म आरती सुरू असताना गुलालाची उधळण केल्याने आग पसरली आणि त्यात 13 जण होरपळले आहेत. जळालेल्यांमध्ये पुजारी आणि तेथील नोकरांचा समावेश आहे. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. महाकाल मंदिरातील भस्मर्तीचे मुख्य पुजारी संजय गुरु, विकास पुजारी, मनोज पुजारी, अंश पुरोहित, सेवक महेश शर्मा आणि चिंतामण गेहलोत यांच्यासह अनेक जण जखमी झाले.

Baramati Loksabha । बारामती मतदार संघावरून देवेंद्र फडणवीसांनी दिला हर्षवर्धन पाटलांना समज, म्हणाले; “असेल त्या उमेदवारासाठी…”

Topers Ad

उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज कुमार सिंह यांनी सांगितले की, भस्म आरतीच्या वेळीही गुलाल वापरला जातो. भस्म आरतीदरम्यान आज गर्भगृहात कापूर जाळण्यात आला, त्यामुळे आत उपस्थित असलेले १३ जण होरपळले. या लोकांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोणत्याही खोल जखमा नाहीत, सर्व स्थिर असून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. मंदिरात दर्शन सुरळीत सुरू आहे. मंदिरात कोणत्याही प्रकारची अडचण नाही.

Lok Sabha Election । ब्रेकिंग न्यूज! ‘या’ मतदारसंघातून अभिनेत्री कंगना राणौत लढवणार लोकसभा निवडणूक; भाजपने दिले तिकीट

त्यावेळी जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाकालेश्वर मंदिरात हजारो भाविकांची उपस्थिती होती. सर्वजण महाकाल सोबत होळी साजरी करत होते. मागून आरती करत असलेल्या पुजारी संजीव यांच्यावर कोणीतरी गुलाल ओतल्याचे जखमी सेवकाने सांगितले. गुलाल दिव्यावर पडला. गुलालात केमिकल असल्याने आग लागली असावी. दुसरीकडे, गर्भगृहाच्या चांदीच्या भिंतीला रंग आणि गुलालापासून संरक्षण करण्यासाठी फ्लेक्स लावण्यात आले होते. यामध्येही आग पसरली.

Congress । काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

Spread the love