Madhya Pradesh Police । सध्या सगळीकडे निवडणुकीचे वारे वाहत आहे. राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. सरकारी अधिकाऱ्यांना इलेक्शन ड्यूटीज चालू झाल्या आहेत. यामधील पोलिसांची सर्वात मोठी आणि महत्वाची भूमिका आहे. कारण इलेक्शन काळात होणाऱ्या गोंधळावर पोलिसच नियंत्रण ठेवू शकतात. मात्र सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छत्तीसगडमधील जगदलपूर-दंतेवाडा राष्ट्रीय महामार्ग-63 वर एक भीषण रस्ता अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
Baba Ramdev । ब्रेकिंग! बाबा रामदेव यांना सुप्रीम कोर्टाचा पुन्हा मोठा धक्का
या अपघातात सीआरपीएफचे १० जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी 3 जवानांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच तातडीने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. दंतेवाडा जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भाग असलेल्या फरासपालमध्ये निवडणूक ड्युटी करून सर्व सीआरपीएफ जवान जगदलपूरला परतत होते, यावेळी हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे.
Crime News । धक्कादायक! भाऊ-बहीण मृतावस्थेत, आई गंभीर जखमी; वडिलांबाबत समजताच….
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दंतेवाडा-जगदलपूर मार्गावरील रायकोटजवळ, समोरून येणाऱ्या एका लहान वाहनाला वाचवताना सैनिकांना घेऊन जाणाऱ्या बसचे नियंत्रण सुटले आणि ती रस्त्यावर उलटली. यांनतर तेथील उपस्थित लोकांनी आणि पोलिसांनी मिळून बसच्या काचा फोडून बसमध्ये अडकलेल्या जखमी जवानांना बाहेर काढले. त्यानंतर रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी जवानांमध्ये ३ जवान गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत.
Parth Pawar । मोठी बातमी! पार्थ पवारांना उमेदवारी जाहीर, ‘या’ मतदारसंघातून लढवणार निवडणूक