Madhya Pradesh | धक्कादायक! पैशासाठी विद्यार्थिनीने रचला अपहरणाचा कट

Madhya Pradesh

Madhya Pradesh | सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीने पैशांसाठी आपल्या वडिलांना फसवण्याचा प्रयत्न केला आहे. 18 मार्च रोजी बैराड येथील शाळा संचालक शिवपुरी यांना मुलगी काव्या धाकड हिच्या अपहरणाची छायाचित्रे व्हॉट्सॲपवर प्राप्त झाली, ज्यामध्ये काव्या धाकडचे हातपाय दोरीने बांधलेले असून अपहरणकर्त्याने 30 लाख रुपयांची खंडणी मागितली होती.

ads

Pradeep Sharma । मुंबई पोलिसांच्या सुपरकॉपमधून प्रदीप शर्मा खुनी कसे झाले? धक्कादायक माहिती समोर

माहितीनुसार, तिने तिच्या मित्रांसह अपहरणाचा कट रचला असल्याची माहिती समोर आली आहे. अपहरण केलेल्या तरुणीचा काही अज्ञातांनी फोटो तिच्या कुटुंबीयांना पाठवला आणि पैशांची मागणी केली. संबंधित तरूणी राजस्थानातील कोटा येथे राहून NEET ची तयारी करते. अपहरणाची घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणाचे गूढ उकलण्यास सुरुवात केली आहे.

Ajit Pawar । अजित पवार आणि धनंजय मुंडे यांना सर्वात मोठा धक्का

काय आहे संपूर्ण प्रकरण?

तपासात गुंतलेल्या पोलिसांनी एकामागून एक अनेक खुलासे केले आणि काव्याचे अपहरण झाले नसून सर्व गोष्टी खोट्या असल्याचे निष्पन्न झाले. विद्यार्थिनीचे अपहरण झाले नव्हते किंवा ती कोटा येथे राहत नव्हती. काव्याने तिच्या दोन मैत्रिणींसोबत मिळून अपहरणाची बनावट स्क्रिप्ट तयार केली होती कारण तिला आणि तिच्या एका मैत्रिणीला परदेशात शिक्षण घ्यायचे होते आणि त्यासाठी पैशांची गरज होती.

Amit Shaha । शिवसेना-राष्ट्रवादी पक्ष कोणामुळे फुटला? अमित शहा यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

Spread the love