Maha Kumbh Mela 2025 । महाकुंभ 2025 चे शुभारंभ, पहिल्या शाही स्नानासाठी भाविकांची गर्दी

Maha Kumbh Mela 2025

Maha Kumbh Mela 2025 । महाकुंभ 2025 चा शुभारंभ आजपासून प्रयागराजमध्ये झाला आहे. सोमवारी, १३ जानेवारी रोजी पौष पौर्णिमेनिमित्त गंगा, यमुना आणि सरस्वती या पवित्र नद्यांच्या संगमावर पहिले शाही स्नान आयोजित करण्यात आले आहे. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत महाकुंभ मेळावा सुरू होईल. यंदा या मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे आणि साधू-संत, तसेच लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत.

Rain Update । सावधान! महाराष्ट्रात थंडीत पावसाची शक्यता, ‘या’ भागांमध्ये सरी बरसणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर महाकुंभ मेळाव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटले, “महाकुंभ असंख्य लोकांना श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीच्या पवित्र संगमात एकत्र आणतो. हा भारताच्या आध्यात्मिक वारशाचं प्रतीक आहे.” पंतप्रधान मोदींच्या या शुभेच्छांनंतर महाकुंभ मेळाव्याचे महत्त्व आणखी अधोरेखित झाले आहे.

Gurucharan Health Update । तारक मेहताच्या सोढीची प्रकृती गंभीर, 19 दिवसांपासून अन्नपाणी सोडले

सुरक्षा व्यवस्थेची दखल घेत, ४५ हजार पोलीस कर्मचारी तैनात केले गेले आहेत. तसेच, २,७५० सीसीटीव्ही कॅमेरे आणि २६८ AI-आधारित व्हिडीओ कॅमेरे स्थानिक आणि गर्दीच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी कार्यरत असतील.

महाकुंभ मेळाव्यात एकूण सहा शाही स्नान होणार आहेत. पहिले शाही स्नान आज पार पडले असून, दुसरे शाही स्नान १४ जानेवारीला मकरसंक्रातीच्या दिवशी होईल. यानंतर, विविध महत्त्वपूर्ण आणि धार्मिक दिवसांवर अन्य शाही स्नानांचा कार्यक्रम होईल.

Santosh Deshmukh Murder Case | सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर; वाल्मिक कराडविरोधात सापडला मोठा पुरावा?

Spread the love