Mahadev Betting App । मोठी बातमी! महादेव बेटिंग ॲपच्या मालकाला पोलिसांकडून अटक

owner of Mahadev betting app arrested by police

Mahadev Betting App । मुंबई : महादेव ॲप (Mahadev App) हे सट्टेबाजी करणारा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. भारतात या ॲपला बंदी घातली असली तरी इतर देशांमध्ये हे ॲप अजूनही चालू आहे. ॲपला छत्तीसगडमधील सौरव चंद्राकर (Sourav Chandrakar) आणि त्याचा सहकारी रवी उप्पल (Ravi Uppal) दुबईतून चालवत होते. या दोघांच्या विरोधात लुक आऊट सर्क्युलर जारी केले होतं. याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. (Ravi Uppal Arrested)

Ravindra Berde । सिनेसृष्टीवर शोककळा! ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं निधन

दुबईतील स्थानिक पोलिसांनी महादेव बेटिंग ॲपच्या मालकाला अटक केली आहे. (Mahadev Betting App Owner Ravi Uppal Arrested in Dubai) सौरव चंद्राकर आणि रवी उप्पल विरोधात ईडीने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आणि त्यानंतर याच नोटीसच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सौरव चंद्राकर आणि रवी उप्पल हे दोघे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. ईडीकडून त्यांचा शोध सुरु होता. (Latest Marathi News)

Rohit Pawar । रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेवर पोलिसांचा लाठीचार्ज, कार्यकर्ते आक्रमक

या प्रकरणी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी महादेव अॅपच्या प्रमोटरांकडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम छत्तीसगडमध्ये नेली जात आहे, अशी माहिती ईडीला मिळाली. त्यानंतर ईडीने हॉटेल ट्रायटन आणि अन्य ठिकाणी झडती घेत तब्बल 5 कोटी रूपये ईडीने जप्त केले. ईडीने असीम दास याला अटक केली असून त्यांनी ही रक्कम छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीतील खर्चासाठी नेली जात असल्याचे मान्य केले. बघेल नेत्याला देण्यासाठी ही रक्कम नेण्यात येत होती. या ॲपच्या बेनामी अकाऊंटची चौकशी करत 15. 59 कोटींची रूपये फ्रिज केले गेले.

Manoj Jarange । मराठा समाज सरकारला पायाखाली तुडवू शकतो, मनोज जरांगेंचा इशारा

Spread the love