
आपल्या सर्वांच्या घराघरांत वीज पोहोचवणाऱ्या महावितरण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड येथे काही जागांसाठी भरती ( Mahavitaran Recruitment) होणार आहे. यापार्श्वभूमीवर महावितरणने अधिसूचना देखील जाहीर केली आहे. या अधिसूचनेनुसार महावितरण कडून अप्रेंटिस पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज ( Online Application) करू शकतात.
एलपीजी गॅस सिलिंडर मिळणार आता अर्ध्याहून कमी किंमतीत! सरकारने सुरू केली ‘ही’ योजना
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मे २०२३ आहे. एकूण ३२० रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. लाईनमन, कॉम्प्युटर ऑपरेटर या शाखांमधील रिक्त पदे याभरती अंतर्गत भरण्यात येणार आहेत. यासाठी १० वी पास व संबंधित विषयात ITI केलेला असणे आवश्यक आहे. १८ ते ३० वयोगटातील तरुण या भरतीसाठी अर्ज करू शकतात. यामध्ये मागासवर्गीयांना ५ वर्षाची सूट देण्यात आली आहे.
Fact check | जेठालाल फेम दिलीप जोशीकडे आहे कोट्यवधी रुपयांची संपत्ती; आकडा एकूण व्हाल थक्क
महावितरणच्या अहमदनगर विभागासाठी ही भरती होणार आहे. ११ मे पासून यासाठी अर्ज नोंदणी सुरू झाली असून १६ मे पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. दरम्यान भरती संबंधित सविस्तर माहितीसाठी महावितरणच्या https://www.mahadiscom.in/ या अधिकृत बेवसाईटला अवश्य भेट द्या. तसेच भरतीची जाहिरात पाहण्यासाठी https://drive.google.com/file/d/1XkJjp5ua0Yv_TFBYDaiFcMh61rFNCT_7/view ही लिंक उघडून पहा
दोन विषयात नापास! विद्यार्थीनीने तणावाखाली उचलले चुकीचे पाऊल; नाल्यात सापडला मृतदेह