CNG Price । सर्वसामान्य जनता महागाईने हैराण झाली आहे. महागाई कमी व्हावी यासाठी सतत आंदोलने केली जातात. पण काही केल्या महागाई कमी होत नाही. त्यात इंधनाचे दर (Fuel rates) गगनाला भिडले आहेत. त्यामुळे अनेकजण इंधनाला पर्याय शोधत आहेत. अशातच आता सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक बातमी आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरचा ताण कमी होऊ शकतो. (Latest marathi news)
सीएनजी गॅसच्या दरात (CNG Gas Rates) मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत महानगर गॅस लिमिटेडने (Mahanagar Gas Limited) सीएनजीच्या दरात कपात केली असून मंगळवारी मध्यरात्रीपासून सीएनजीचे दर (CNG Gas) कमी केले आहेत. महानगर गॅस लिमिटेडकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. वाहनांमधील नैसर्गिक वायूचे प्रमाण वाढावे सीएनजीचे दर कमी केले आहे.
मुंबईत सीएनजीच्या दरात प्रतिकिलो २.५० रुपयांची कपात केली आहे. नवीन दरानुसार मुंबईकरांना आता एक किलो सीएनजीसाठी केवळ ७३.४० रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबईत मोठ्या प्रमाणात सीएनजीवर चालणारी वाहने आहेत. दरात घसरण झाल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पण पीएनजीच्या दरात कोणताही बदल केला नाही.
Manoj Jarange Patil । …तर जेलमध्येही मोर्चा काढणार, जरांगे पाटलांनी सरकारला दिलं खुलं आव्हान