मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक (Maharashtra-Karnataka) सीमावाद चालू आहे. मात्र आता हा वाद आणखी चिघळला आहे. बेळगावजवळ हिरेबागवाडी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे. आता यावर महाराष्ट्रातील विरोधीनेते आक्रमक झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक सरकारला गंभीर इशारा दिला आहे.
मत मागायला आल्यास अपमान करण्यात येईल; बारामतीमध्ये अनोख्या फ्लेक्सची जोरदार चर्चा
“येत्या ४८ तासांत हे प्रकरण संपलं नाही, तर माझ्यासकट सर्व लोकांना बेळगावामधील लोकांना धीर देण्यासाठी जावं लागेल. असा इशारा शरद पवार यांनी दिला होता. आता यावरून नाशिकच्या महंतांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे.
नाशिकचे महंत नचिकेत शास्त्री जोशी यांनी शरद पवारांवर जहरी टीका केली आहे. त्यांनी शरद पवारांना दत्त उपासना करण्याचं आवाहन केलंय. अशा खोचक शब्दांमध्ये त्यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.
बारामतीत धक्कादायक प्रकार! महाविद्यालयीन विद्यार्थ्याला लुटलं नंतर काढले नग्न फोटो
दरम्यान, काल कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक केली आहे. यामुळे तेथील टोलनाक्यावर वातावरण चिघळलं. कन्नड रक्षण वेदिकेचे नेते नारायण गौडा आहेत. त्यांना पोलिसांनी हा दौरा करण्यास मनाई केली होती तरी देखील ते बेळगावच्या दिशेने आले. त्यामुळे हिरेबागवाडी येथील टोलनाक्यावर पोलिसांनी त्यांना रोखलं. यावेळी संतापलेल्या कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक केली.