Maharashtra Assembly Elections । सर्व्हेतून मोठी माहिती समोर! राज्यात महायुती की महाविकास आघाडी कोण मारणार बाजी?

Maharashtra Assembly Elections

Maharashtra Assembly Elections । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची धामधूम सध्या सुरू असून, मतदानासाठी अवघे 10 दिवस शिल्लक आहेत. यामुळे सगळीकडे प्रचारसभा आणि प्रचाराचे जल्लोष सुरू आहेत. दोन्ही प्रमुख आघाड्यांकडून दिल्लीतील बडे नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. याचदरम्यान, एक प्रसिद्ध मॅटराईज ओपीनियन पोल समोर आला असून, यामध्ये राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही आघाड्यांच्या ताकदीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

mumbai pune expressway accident । मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर खाजगी बसचा अपघात, 15 जण जखमी

या सर्व्हेनुसार, महायुतीला 145 ते 165 जागा जिंकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, तर महाविकास आघाडीला 106 ते 126 जागांपर्यंत सीमित राहण्याची शक्यता आहे. राज्यात एकूण 288 विधानसभा जागा आहेत आणि यंदा महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे. महायुतीत शिवसेना एकनाथ शिंदे, भाजप आणि अजित पवार यांचा गट आहेत, तर महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस यांचा समावेश आहे.

Oben Rorr EZ: इलेक्ट्रिक बाईक क्षेत्रात नवीन क्रांती, 175 किमी रेंज आणि 95 किमी/तास टॉप स्पीड

सर्वेक्षणानुसार, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, मुंबई, ठाणे-कोकण आणि उत्तर महाराष्ट्र या सर्व प्रमुख क्षेत्रांमध्ये महायुतीला जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 31 ते 38 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महाविकास आघाडीला 29 ते 32 जागांपर्यंत सीमित राहण्याची शक्यता आहे. विदर्भात महायुतीला 27 ते 32 जागा मिळू शकतात, तर महाविकास आघाडीला 21 ते 26 जागा मिळण्याची संभावना आहे.

Bjp । सर्वात मोठी बातमी! निवडणुकीच्या तोंडावर भाजपला सर्वात मोठा झटका

तसेच, मुंबईत महायुतीला 21 ते 26 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महाविकास आघाडीला 10 ते 13 जागा मिळण्याची शक्यता आहे. ठाणे-कोकण मध्ये महायुतीला 23 ते 25 जागा आणि महाविकास आघाडीला 10 ते 11 जागा मिळू शकतात. उत्तर महाराष्ट्रात महायुतीला 14 ते 16 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महाविकास आघाडीला 16 ते 19 जागा मिळू शकतात. हा सर्व्हे यापेक्षा जास्त खरा ठरेल की नाही, हे 23 नोव्हेंबरला निवडणूक निकाल जाहीर झाल्यावरच स्पष्ट होईल.

Ajit Pawar । अजितदादांच टेन्शन वाढवणारी बातमी समोर, ‘या’ नेत्यांनी दिला मोठा झटका

Spread the love