Maratha Reservation । जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका मराठा (Maratha) समाजाने घेतली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत, अशातच आता आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Latest marathi news)
काही दिवसांपूर्वीच राज्य सरकरानं (State Govt) मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्याबाबत परिपत्रकही राज्य सरकारनं काढलं असून अजूनही त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही, त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला (Maratha Reservation Strike) बसले आहेत, या कायद्याची तातडीने अंमलबजाणी व्हावी यासाठी येत्या 14 तारखेला शांततेमध्ये महाराष्ट्र बंद पाळा, असं आवाहन सकल मराठा समाजाने केले आहे.
Manoj Jarange Patil । मोठी बातमी! मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
याबाबत सकल मराठा समाजाकडून मेसेजेसही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत. सरकारच्या जीआरची अंमलबजावणी होत नसल्याने सकल मराठा समाजाकडून 14 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे आता सरकार जीआरची अंमलबजावणी कधी करणार याकडे मराठा समाजाचं लक्ष लागले आहे.
Mahesh Gaikwad । गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत समोर आली मोठी अपडेट!