Maharashtra Crime l नालासोपाऱ्यात 17 वर्षीय मुलीवर दोन व्यक्तींनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहणारी पीडित मुलगी तिच्या मैत्रीणीला भेटण्यासाठीनालासोपाऱ्यात जात होती. याच दरम्यान, तिची ओळख 25 वर्षीय सोनू नावाच्या तरुणाशी झाली, जो एका फोटो स्टुडियोत काम करतो.
Sharad Pawar । झेड प्लस सुरक्षेबाबत शरद पवारांचे सर्वात मोठे वक्तव्य!
गुरुवारी, सोनूने पीडितेला नालासोपारा स्थानकावर बोलावले आणि फिरण्याच्या बहाण्याने तिला रिक्षात बसवले. नंतर त्यांनी तिला नगीनदासपाडा येथील एका निर्जनस्थळी नेले आणि तिथे आळीपाळीने दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. या भीषण घटनेनंतर, पीडित मुलगी घरी परतून आपल्या पालकांना सर्व माहिती दिली.
पालकांनी लगेच पोलीस स्थानकात धाव घेतली आणि याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तातडीने दोन्ही आरोपींना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी पुष्टी केली की, आरोपींविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे नालासोपार आणि सुमारेच्या भागात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांनी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी आता पुढील तपास सुरु केला असून, पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न सुरु आहेत.